आपल खान्देशमहाराष्ट्र

आमदार किशोरआप्पा पाटील पाचोऱ्यातच प्रतिअयोध्या, श्रीराम मंदिर परिसर सकरणार …

आयोध्येतील भव्य प्रभु श्रीराम मंदिराच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर पाचोरा शहरातील प्राचिन कालीन श्रीराम मंदिर परिसरातील सुशोभीकरणासाठी तब्बल 10 कोटी रुपयांच्या विविध विकास निधी मंजूर झाल्याने रामभक्तांना आनंद झाला आहे. पाचोरा श्रीराम मंदिराचे महंत १००८ परम तपस्वी विष्णूदासजी महात्यागी महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन आमदार किशोर पाटील आणि सुनीता किशोर पाटील यांचे हस्ते झाले. श्रीराम मंदिर परिसराचे काम पूर्ण कधी होते उत्सुकता लागली आहे.

  • काय म्हणाले आमदार किशोर पाटील?

आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आज पाचोऱ्यातील प्रभू श्रीराम मंदिराचा भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. हजारो वर्षांपासूनचे पुरातन हे मंदिराचे येणाऱ्या एक-दोन वर्षांत अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या धर्तीवर आमचे हे पुरातन, आमच्या पुर्वजांनी उभी केलेली ही वास्तूची नवचैत्यन्यामध्ये निर्मिती व्हावी, अशी प्रार्थना आमदार किशोर पाटील यांनी यावेळी केली.

सर्वांनी सहकार्य केल्यास अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या धर्तीवर पाचोयातील प्रभू श्रीरामचंद्राचे सौंदर्य उभे झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच शासनाच्या अटींमुळे मी जरी मंदिर-मस्जिदला निधी देऊ शकत नसलो, तरी या श्रीराम मंदिराच्या परिसराला लागणारा आवश्यक तो निधी देण्याची जबाबदरी एक रामभक्त म्हणून आमदार किशोर पाटील यांनी स्विकारली.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गोहील, गजानन जोशी, रावसाहेब पाटील, सुनील पाटील, किशोर बारावकर, माजी नगरसेवक  शरद पाटे, गंगाराम पाटील, प्रवीण ब्राह्मणे, मनोज शांताराम पाटील उपस्थित होते.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे