आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
महाराष्ट्रात काल विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस
महाराष्ट्रात आज एकाच दिवशी तब्बल 5 लाख 52 हजार 909 जणांचे लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे
राज्यात आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास (Corona Vaccination) सुरुवात झाली आहे. राज्यात आज एकाच दिवशी तब्बल 5 लाख 52 हजार 909 जणांचे लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे

महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे 2 कोटी 85 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज दिवसभरात 5 लाख 52 हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री 8 वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी 26 एप्रिल रोजी एकाच दिवशी 5 लाख 34 हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.





