महाराष्ट्र
भाजपाने मिळविली वाहवा, शिवसेना बॅकफुटवर?
झूम मराठी
मागील दहा दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील राजकीय पेचप्रसंग एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर थंडावला. भाजपाने मोठी राजकीय खेळी करून बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा व सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून शिंदे यांना मुख्यमंत्री बनविले. तर मुख्यमंत्री म्हणून काम केलेले भाजपाचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
राजकीय घडामोडीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांबाबत जनसामान्यांमध्ये सहानुभूतीची लाट होती. भाजपा सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी हे सर्व करत आहेत. असे वाटत असताना भाजपाने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंना देवून भाजपाने वाहवा मिळवत सेनेला बॅकफुटवर टाकले आहे.



