आपल खान्देश

उद्धव ठाकरे साहेब आम्ही तुमच्या सोबत तुम्ही फक्त लढा..असे रक्ताने लिहत शिवसैनिकांनी दिला पाठींबा..

झूम मराठी वृत्त

भडगाव (झूम मराठी) राज्यात मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय नाट्य सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत आमदारांना घेत बंड केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकटं पाडत राज्यात आमदारांनी उद्धव ठाकरेच्या विरुद्ध उभे ठाकले आहेत. उद्धव ठाकरे साहेब आम्ही तुमच्या सोबत तुम्ही फक्त लढा..असे रक्ताने लिहत भडगावातील शिवसैनिकांनी शिवसेनेला दिला पाठींबा देत आंदोलन करण्यात आले. तसेच युवासेनेचे लखीचंद पाटील, निलेश पाटील, रघुनंदन पाटील यांनी स्वतःच रक्त देवुन उध्दवसाहेबांना पत्र दिले “खुन दीया है जान भी देंगे!”

राज्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन करावी, अशी मागणी शिंदे गटाने केली त्या गटात स्थानिक आमदार किशोर पाटील पण आहेत म्हणुन पाचोरा भडगाव मतदार संघात शिवसेना मध्ये फूट पडेल की काय याचीच चर्चा होतांना दिसत आहॆ. म्हणून भडगाव शहरातील या अनोख्या आंदोलन हे चर्चेचा ठरला व शिवसैनिकांनी स्व-रक्ताने पत्र लिहत शिवसेनेला दिला पाठीबा याची तालुक्यात मोठी चर्चा सुरु आहॆ.

यावेळी पक्षप्रमुख, मुख्यमंत्री  उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ भडगाव शहर व तालुक्यातील महिला आघाडीचे पुष्पाताई परदेशी, शिवसेना – युवासेनेचे डॉ.प्रमोद पाटील, दिपक पाटील, गोरख पाटील, मनोहर चौधरी, गणेश परदेशी, अनिल महाजन, बंटी सोनार, जे. के. पाटील, नरेश पाटील, माधव राजपूत, जहांगीर मालचे, सुरेश सोनवणे, पिंटू मराठे, राहुल पाटील, योगेश पाटील, शशिकांत पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, गुलाब पाटील, विश्वास पाटील, शामकांत पाटील, राजु चव्हाण, मनोज धाडिवाल, भालचंद्र पाटील, रतन कोळी, अनिल पाटील, निळकंठ पाटील रामलाल महाजन, राजु पाटील, दीपक पाटील, संजय पाटील, भाऊसाहेब पाटील, मनोहर महाले, रवींद्र पाटील, पप्पु पाटील, सुभाष पाटील, बबलु पाटील, गोपी पाटील, विनोद राजपुत, प्रशांत गालफाडे, चेतन राजपुत, यश बिरारी, प्रशांत सोनवणे, भैय्या पाटील, भोला पाटील, ज्ञानेश्वर महाजन, विशाल पाटील व असंख्य शिवसैनिक युवासैनिकांनी घोषणा देऊन समर्थन केले…


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे