आपल खान्देश

अंमळनेर – निकृष्ट कामाची बातमी लावल्याचा राग मनात धरून नगरसेवकाची पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी


झूम मराठी वृत्त

अमळनेर येथील पत्रकार तथा दिव्य लोकतंत्र न्यूज पोर्टलचे संपादक समाधान मैराळे यांनी प्रभाग क्रमांक दोन मधील निकृष्ट दर्जाच्या कामांसादर्भात बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागाने प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक संतोष पाटील उर्फ भुरा आप्पा यांनी पत्रकार समाधान मैराळे यांना फोन करुन खोटा गुन्हा दाखल करून अडकवून टाकू. आणि जर बातम्या थांबवल्या नाहीत तर जीवे ठार मारू अशी धमकी दिली. या बाबत अमळनेर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिव्य लोकतंत्र ऑनलाइन न्युज पोर्टलचे संपादक समाधान मैराळे यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील निकृष्ट कामांसंदर्भात बातम्या प्रकाशित केल्या होत्या. त्याच प्रकारे अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील सानेनगर भागातील देखील बातम्या प्रसिद्ध केल्या. याचा संबंधित नगरसेवकाला राग आल्याने त्याने पत्रकार मैराळेंना फोन करून अरेरावीची भाषा करत खोटा गुन्हा दाखल करून अडकवून देऊ अशी धमकी दिली. तर बातम्या थांबवल्या नाहीत तर जीवे ठार मारू अशीही धमकी दिली होती. याच बाबत आज अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान संबंधित नगरसेवकावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे