महाराष्ट्र
MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही, विद्यार्थ्यांची आत्महत्या, आम्हालाही आत्महत्येची परवानगी द्या 413 विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र…
महाराष्ट्रातील स्वप्निल लोणकर या 24 वर्षीय (राहणार पुणे फुरसंगी) तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्ये अगोदर एक सुसाइड नोट लिहीली आहे, त्यात महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाचं विदारक चित्र स्पष्ट होत आहे.
गेल्या दीड वर्षापासून स्वप्निल लोणकर हा तरुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही न मिळाल्याने तणावाखाली होता. स्वप्निल ने MPSC ची पूर्व आणि मुख्य परीक्षा पास केली होती. दीड ते दोन वर्ष झाली तरी निर्णय होत नाही. वय वाढत चालले आहे.
जर करोना नसता तर कदाचित नियुक्ती झाली असती असे त्याने सुसाइड नोट मध्ये लिहिले आहे. स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बनविण्याचा छोटा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. अशा परिस्थितीत आपल्या वडिलांना आपण अधिकारी झाल्यानंतर सुखाची भाकर मिळेल असा विचार करणाऱ्या स्वप्निलला एवढे कष्ट करुनही नोकरी मिळाली नाही.
अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील 413 विद्यार्थ्यांची झाली आहे. MPSC परीक्षा पास होऊनही त्यांना अद्यापर्यंत नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.




