आपल खान्देशकृषीवार्ता

पाचोऱ्यातील बडगुजर दांपत्यास प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण..

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळाली संधी..

पाचोरा येथील आदर्श शेतकरी बापूराव बडगुजर व त्यांच्या पत्नी ज्योती बडगुजर यांना येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या शासकीय संचलन कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

कृषी आयुक्तालय, संचालक फलोत्पादन विभाग पुणे व जिल्हा कृषी अधीक्षक जळगाव यांच्यातर्फे पाचोऱ्याचे आदर्श शेतकरी बापूराव बडगुजर यांना हे निमंत्रण प्राप्त झाले आहे. कृषी विषयक कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात संचलनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते. राज्यातील १० शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (प्रति थेंब अधिक पीक) विशेष पाहुणे म्हणून राज्यातर्फे निवडण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या व प्रभावीपणे काम केलेल्या शेतकऱ्यांची या सोहळ्यासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यातील १० शेतकऱ्यांना (सपत्नीक) उपस्थितीचे निमंत्रण देण्यात आले आहे, त्यात पाचोरा येथील बापूराव बडगुजर व ज्योती बडगुजर यांचा समावेश आहे. येत्या २४ ते २६ जानेवारी दरम्यान त्यांना शासनातर्फे दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले आहे. याबद्दल बडगुजर दाम्पत्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे