आपल खान्देश

पाचोरा येथे भाजप भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश पदाधिकारी यांची भेट

भाजपा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांचा नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा निमित्ताने त्यांचे काल पाचोरा शहरांत आगमन झाले त्याचे भाजप व भाजपा भटके विमुक्त आघाडी पाचोरा तालुक्याच्या वतीने स्वागत करण्यात आले.

संपादक – दिलीप जय परदेशी

पाचोरा (प्रतिनिधी) भाजप भटके विमुक्त आघाडीची संघटनांत्मक बांधणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संयोजक व माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असतांना आज पाचोरा शहरांत यांचे आगमन झाले.

पाचोरा येथील जळगाव चौफुली जवळील पुण्यश्लोक राजमाता अहील्यादेवी होळकर चौकात काल दि.७ आँगस्ट शनिवारी दुपारी ३ वाजता भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक, मा.आ.नरेन्द्र पवार, महिला प्रदेश संयोजिका मा.डॉ. ऊज्वलाताई हाके, प्रदेश महिला युवती संयोजिका,अँड.भाग्यश्री ताई ढाकणे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख, मा.प्रमोदजी परदेशी, प्रदेश सहसंयोजक अशोक चोरमले, आदी मान्यवरांनी भेट देऊन राजमाता पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले, यावेळी सर्व मान्यवरांचे पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजप पाचोरा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, शहरध्यक्ष रमेश वाणी, भटके विमुक्त आघाडी तालुका अध्यक्ष संजय परदेशी, कीशोर पेंढारकर, धोंडु हाटकर, सुनील निळे, निवर्ती हाटकर, नाना कंखरे, मयुर परदेशी, प्रशांत परदेशी, सौ.संगीता पेंढारकर, सौ.रेखा हाटकर, सुनिल धनगर, ई.सह पाचोरा शहर आणि तालुक्यातील भटके विमुक्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे