आपल खान्देशमहाराष्ट्र

खान्देशातील पाडळसरे धरण हे जल परिषदेची फलश्रृती – विकास पाटील


 पाडळसरे धरण आंदोलन समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश – सुभाष आण्णा चौधरी

सूर्यकन्या तापी नदी ही खान्देशची लाईफलाईन आहे. तापी नदीवरील पाडळसरे निम्न तापी प्रकल्प हा अमळनेर, पारोळा, शिंदखेडा व धरणगांव, एरंडोल, चोपडा तालुक्यांना नवसंजीवनी देणारा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. तांत्रिक अडचणी मुळे म्हणा की पुरेशा निधीच्या कमतरतेमुळे म्हणा किंवा राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे म्हणा प्रदिर्घ काळ प्रलंबित असलेला व संथगतीने मार्गक्रमण करणारा महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प ठरला आहे. गेल्या तीन दशकाहून अधिक काळ प्रलंबित असलेला पाडळसरे प्रकल्पासाठी पाडळसरे धरण संघर्ष समितीचं योगदान अतुलनीय व अद्भुत आहे.

तसेच योग्यवेळी उत्तर महाराष्ट्र जल परिषदेची साथ तर स्थानिक नेतृत्व मंत्री महोदय अनिल पाटील यांचे अथक पाठपुराव्यामुळे,अखंड पाठिंब्यामुळे व योग्य रणनितीमुळे पाडळसरे धरणासाठी ४८९० कोटी रुपयाची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता (सु.प्र.मा.) मिळवून दिली. त्याचप्रमाणे या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी मंत्री महोदय तसेच खासदार उन्मेश पाटील यांना अधिकचे प्रयत्न करावे लागणार आहेत. तरच प्रकल्प अधिक जलदगतीने योग्यरितीने पुर्णत्वाकडे जाईल व हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, लाखो लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल तसेच या भागातील शेकडो उद्योगांना व शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमचा सूटणार आहे.

खान्देश वासियांनी एकजूटीने व एकदिलाने एकत्र येऊन काम करणेही गरजेचे आहे .असे झाल्यास खान्देशातील सर्व छोटे मोठे प्रकल्प मार्गी लागू शकतात. खान्देशात जलक्रांती,कृषीक्रांती व उद्योगक्रांतीची बीजे रोवली जातील. त्यामुळे खान्देश दुष्काळमुक्त,टंचाईमुक्त व आत्महत्यामुक्त होईल. असे आवहान उत्तर महाराष्ट्र जलपरीषदे तर्फे सर्व पाणी प्रश्नावर काम करणा-या संघटनांना करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे