आपल खान्देशमहाराष्ट्र

पाचोऱ्याच्या प्रशांत पाटील यांची मनसेच्या जळगाव जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड.

  • दिलीप जय परदेशी

पाचोरा (झूम मराठी) मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने पाचोऱ्यातील युवा उद्योजक प्रशांत पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली असून त्यांना जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी नियुक्ती पत्र देऊन जबाबदारी देण्यात आली.

युवा उद्योजक प्रशांत संजय पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाउपाध्यक्षपदी निवड राजसाहेब ठाकरे यांनी प्रशांत पाटील यांची सामाजीक शैक्षणिक व शेतकऱ्यांन साठी वेळोवेळी आंदोलन उपोषण व सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा सतत प्रयत्न करीत असतात त्यांची दखल वृत्तपत्रांच्या माध्यमातून मनसेचे वरिष्ठ नेते यांनी घेतली होती, म्हणून पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ याच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. पाचोरा शहराच्या जनतेला त्यांनी वेळोवेळी न्याय मिळून देण्यासाठी झटत असतात त्याच बरोबर रस्ते/गटारी व्हावे यासाठी 3 दिवस आमरण उपोषण करून रस्ते मंजूर करून घेतले होते.   गोर, गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप करण्याचे काम दरवर्षी ते करत असतात आता पर्यंत 450 महिलांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळून दिला आहे सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतात संघटनेच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला न्याय मिळून देण्याचे काम त्यांनी केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे