ब्रेकिंग

Dhangar Reservation : गिरीश महाजनांच्या पत्रानंतर चंद्रकांत वाघमोडे यांचे बारामती येथील उपोषण मागे

धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात व्हावा या साठी गेल्या तेरा दिवसांपासून सुरु असलेले उपोषण चंद्रकांत वाघमोडे यांनी आज मागे घेतले..

बारामती येथे  धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात व्हावा या साठी गेल्या तेरा दिवसांपासून सुरु असलेले उपोषण चंद्रकांत वाघमोडे यांनी आज मागे घेतले. राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी खंडेराव कोकरे व माजी खासदार डॉ विकास महात्मे यांच्या हस्ते उपोषण सोडले.

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर चंद्रकांत वाघमोडे तेरा दिवसांपासून उपोषण करत होते. खासदार विकास महात्मे यांनी आज (ता. 21) त्यांची भेट घेतली. राज्य सरकारकडे या प्रश्नाबाबत पाठपुरावा केल्यानंतर आज संध्याकाळी गिरीश महाजन यांनी लेखी पत्र देत या प्रश्नावर राज्य शासनाच्या वतीने बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही दिली. सरकार या प्रश्नाबाबत गंभीर असून धनगर समाजाला न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे गिरीश महाजन यांनी पत्रात नमूद केले आहे.

धनगर आरक्षणाच्या चळवळीचे जनक बी.के.कोकरे यांचे वडील खंडेराव कोकरे यांनी ज्यूस देऊन चंद्रकांत वाघमोडे यांचे उपोषण सोडले. या प्रसंगी खासदार विकास महात्मे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, तहसिलदार गणेश शिंदे, पोलिस निरिक्षक दिनेश तायडे, प्रमोद परदेशी व आदी उपस्थित होते. दरम्यान धनगर आरक्षणाबाबत सरकारने मागितलेल्या मुदतीच्या कालावधीत राज्यात फिरुन जनजागृती करणार असल्याचे चंद्रकांत वाघमोडे यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे