आपल खान्देश
आज पाचोऱ्यात वर्ल्ड कप फायनलचे भव्य स्क्रीनवर प्रक्षेपण !
क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे आज एम एम कॉलेज आवारात भव्य स्क्रीनवर मोफत प्रक्षेपण दाखविण्यात येणार असल्याची माहिती आयोजक सूरज वाघ यांनी दिली.
यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये अतिशय फार्मात असलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचल्याने संपूर्ण भारतात अंतिम सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे. सदर सामना पाचोरेकरांना सामूहिकरित्या पाहण्याचा आनंद देण्यासाठी याला पाचोरा शहरातील एम एम कॉलजच्या आवारात भव्य स्क्रीनवर पाहण्याची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. सूरज वाघ व मित्र परिवार यांच्या वतीने सदर आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि १९ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रक्षेपणास सुरूवात होणार आहे.




