आपल खान्देश

कर्जत : नेरळ येथे इसमाची आत्महत्या !!

कर्जत : नेरळ पूर्व भागातील एका 45 वर्षीय इसमाने घरासमोरील झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (11 एप्रिल) समोर आली आहे. शिवराम बारकू भोईर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या लॉकडाऊनपासून हाताला काम नसल्याने ते बेरोजगार होते, अशी माहितीही पुढे आली आहे.

शिवराम भोईर हे मूळचे नेरळ कळंब येथील असून ते गेल्या 20 वर्षांपासून नेरळ बस स्टॉप येथील साई सोसायटी येथे राहत होते. घराचे काम सुरु असल्याने सध्या ते बाजूलाच असलेल्या एका चाळीत भाड्याने रुम घेऊन राहत होते. शिवराम हे कामासाठी मुंबई-दादर येथे सोन्याच्या दुकानात कामाला होते. मात्र लॉकडाऊननंतर ते घरीच होते.

नेरळ पूर्व भागात असलेल्या साई सोसायटी येथे आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या व्यक्तीला शिवराम झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले, त्यानंतर ही घटना उघडकीस आली. अचानक शिवराम यांनी राहत्या घरासमोर झाडाला दोरीने गळफास लावून जीवन संपवल्याने स्थानिक नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शिवराम यांचे मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नेरळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि शिवराम भोईर यांचा मृतदेह खाली उतरवून, शवविच्छेदनासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यता आली असून, अधिक तपास नेरळ पोलीस करत आहेत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे