Chalisgaon | शहराच्या चिमुकल्यांनी साकारली मुरुड जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती..!
मोबाइलच्या युगात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बातमी.
चाळीसगाव (झूम मराठी) चाळीसगाव शहरातील महावीर कॉलनी परिसरातील दीपक ठाकरे यांचे चिरंजीव ओम ठाकरे आणि त्याचे मित्र मैत्रिणी यांनी मिळून दिवाळीमध्ये सुंदर असा किल्ला बनवला असून मुरुड जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
आपल्या अंगणामध्ये बनवलेला हा किल्ला त्यावरील रोषणाई विविध रंगातील लाइटिंग यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी आता आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिकांनी भेट दिली आहे.
आताच्या मोबाईलच्या युगात मोबाईल गेम मध्ये अडकत चाललेल्या बालकांनी या विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन दिवाळीमध्ये किल्ले बनवण्याची आपली परंपरा कायम ठेवावी तसेच बनवलेला किल्ला अत्यंत सुंदर असून या बालकांचे कौतुक करत आपल्या चाळीसगाव तालुक्याच्या आसपास असलेल्या किल्ल्यांबद्दल त्यांना माहिती दिली व सुट्टीचा दिवस एखाद्या किल्ल्याला भेट देऊन तेथील इतिहास व वास्तू जाणून घेण्याचे त्यांना आवाहन केले जवळपास आठ दिवस मेहनत घेऊन या मुलांनी हा किल्ला बनवला आहे ओम दिपक ठाकरे, रेणुका दिपक ठाकरे, प्रेम नितीन शिंदे, प्रसाद मनोज वडनेरे, साई ज्ञानेश्वर शेलार, मयूर अजय रोकडे, दक्ष निलेश देशमुख, आदित्य सचिन जाधव, पायल नितीन शिंदे, दिव्या सचिन जाधव, परी मनोज वडनेरे, तनु खान कृष्णा पुंडलिक माळी यांचा समावेश आहे तर त्यांना प्रोत्साहन देणारे ठाकरे कुटुंबीय यांचा देखील यात मोलाचा सहभाग असल्यामुळेच मुलांमध्ये ही आवड निर्माण होऊ शकली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेत ओम ठाकरे व त्याच्या मित्रांना हा किल्ला बनविण्यासाठी तब्ब्ल आठ दिवस लागले असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रेरणादायी असे कार्य या चिमुकल्यांची केले आहे.



