Kishor Aappa Patil News : पक्ष फुटला,पण भाऊ बहिणीचं नातं टिकलं…
भावाबहिणीचे नाते जपलेच नाही, तर ते कायम ठेवत वाढवले आहे..
Kishore Aappa Patil News पक्ष फुटला,पण नातं टिकलं; शिंदे गटाचे किशोर पाटील अन् ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांची अनोखी ‘भाऊबीज’..
दिलीप जय परदेशी (9022764411)
Pachora Bhadgoan News : शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांतील संघर्ष टोकाला गेलेला असून त्याचा प्रत्यय राज्यात दिसून येतो. अशा परिस्थितीत सुद्धा या दोन्ही गटांतील दोन मोठ्या नेत्यांनी भाऊबीज बुधवारी साजरी केल्याने तो पाचोरा भडगाव मतदार संघात चर्चेचा विषय झाला.
पाचोरा भडगावचे शिंदे शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील (Kishore Appa Patil) यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केली.
राज्यातील शिवसेना पक्ष दुभंगल्यानंतर भाऊबीज साजरी करण्याचे किशोरआप्पा व वैशूताईंचे हे दुसरे वर्ष आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे फायरब्रॅण्ड नेत्या अशी प्रतिमा असलेल्या वैशाली सूर्यवंशी ह्या त्यांचाच भाऊ आमदार किशोर पाटील यांच्या प्रतिस्पर्धी मानल्या जातात शिवसेना (Shivsena) दुभंगल्यानंतर हे दोघे दोन वेगवेगळ्या गटात जाऊन एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाले असले, तरी त्यांनी आपले भावाबहिणीचे नाते जपलेच नाही, तर ते कायम ठेवत वाढवले आहे. त्यामुळेच दोन्ही शिवसेनेतील तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यातील दिवाळी गोडवा तथा भाऊबीजेची चर्चा होत आहे.



