पाचोरा तालुक्यातील तारखेड्यात अवैध गौण खनिज उपसा; वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दांडात्मक कारवाई?
दिवसा ढवळ्या तारखेड्यात अवैध गौण खनिज चोरी करणाऱ्यानां आशीर्वाद कुणाचा आहॆ..
पाचोरा तालुक्यातील तारखेड्यात अवैध गौण खनिज उपसा दिवसा ढवळ्या सुरु आहॆ अशी गुप्त माहिती महसूल प्रशासनास काही सुज्ञ नागरिकांनी दिली, पाचोरा तारखेडा रोडवर बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चार ट्रक वाहनांवर पाचोरा तालुका महसूल प्रशासनाने कार्यवाही करून सक्त कारवाईचे पाऊल उचलत गौणखनिज वाहतुक करणाऱ्यानां दणका दिला आहे त्यावर कुठली कारवाई होते ते बघणे महत्वाचे ठरणार आहॆ.
पाचोरा ते तारखेडा रोडवर अनधिकृत रित्या वाहतुक सुरु असुन अशी गुप्त माहिती सागर बागुल आणि सुधाकर पाटील या अधिकाऱ्यानां मिळाली त्या माहिती च्या आधारे आज दुपारी प्रत्येक्ष पाहणी करावयास गेले असता, त्यांना अनधिकृत वाहतुक करणारे चार वाहन आढळुन आले त्या अधिकारींनी अनधिकृत वाहतुक करणाऱ्या (बी न इन्फ्रा कन्स्ट्रक्शनच्या ) ट्रक चालकांजवळ गौणखनिज वाहतुकीचा अधिकृत परवान्याची मागणी केली असता त्यांच्या कडे कुठलाच परवाना आढळुन आला नाही! त्या प्रकरणी त्या चार ट्रकांसह त्यातील एकूण बारा ब्रास मुरूम जप्त केले असून त्यांचा पंचनामा करून त्यावर दंडात्मक कारवाई करण्याकरीता सदर वाहन तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले असून, दिवसा ढवळ्या तारखेड्यात अवैध गौण खनिज चोरी करणाऱ्यानां आशीर्वाद कुणाचा आहॆ ही माहिती महत्वाची ठरणार आहॆ.
पाचोरा तहसील विभागास पंचनामाची कागदपत्रे व माहिती देण्यात आलेली आहे, तर सदर कन्स्ट्रक्शन कंपनी ही नवीन होत असलेल्या तिसऱ्या रेल्वे रुळाच्या कामासाठी मुरूम पुरवठा करते, त्यासाठी काम करीत असून मोठ्या प्रमाणात गैर कारभार होऊन मोठा गौण खनिज साठ्याची चोरटी झाली असल्याची चर्चा गावात सुरू आहे, गावातील गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लावणाऱ्या या मुरूमचा पुरवठा करणाऱ्या कंपनीवर व यांकडे डोळे झाक करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी तारखेडा येथील नागरिकांनी केली असून त्यावर कुठली कारवाई होते ते बघणे महत्वाचे ठरणार आहॆ.



