आपल खान्देश

सामनेर सोसायटीच्या चेअरमन पदी माणिकराव पाटील तर व्हाइस चेअरमनपदी शारदा चव्हाण यांची बिनविरोध निवड..

पाचोरा ( प्रतिनिधी ) सामनेर तालुका पाचोरा तालुक्यातील सामनेर प्राथमिक कृषी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुनील हरी पाटील व व्हा. चेअरमन अण्णा पवार ठरल्याप्रमाणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता. निवडणूक कार्यक्रम प्रक्रियेत निवृत्त माध्यमिक शिक्षक श्री आबासो माणिकराव माधवराव पाटील (सेवानिवृत्त शिक्षक) यांचा चेअरमन पदासाठी तर शारदाबाई एकनाथ चव्हाण यांची व्हा. चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक मंडळातील बाळकृष्ण साळुंखे, साहेबराव पाटील, रवींद्र साळुंखे पंढरीनाथ पाटील, दगा भिल, अण्णा पवार , सुनील पाटील,विजय पाटील, मयूर पाटील, रेखाबाई नेरपगार, लीना सोनकुळ संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार विभागाचे अधिकारी दीपक पाटील यांच्या अध्यक्ष खाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. चेअरमन माणिकराव पाटील व व्हा चेअरमन शारदाबाई चव्हाण यांचा गावातील नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच पती भोलेनाथ भिल ग्रामपंचायत सदस्य महेंद्र साळुंखे, प्रा. राजेंद्र साळुंखे, गोरख नेरपगार, एकनाथ चव्हाण सुनील साळुंखे, प्रमोद पाटील, प्रशांत साळुंखे, सचिव छगन गवळी लिपीक अविनाश पाटील प्रताप पाटील आदी उपस्थित होते. फोटो – सामनेर सोसायटी चेअरमन माणिकराव पाटील, व्हा चेअरमन शारदाबाई चव्हाण यांच्या निवड झाल्याबद्दल सत्कार प्रसंगी संचालक, पदाधिकारी व ग्रामस्थ.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे