आपल खान्देशब्रेकिंग

पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथे रेल्वे अपघातात, रेल्वे रूळ ओलांडताना एकाच गावातील दोन जणांचा मृत्यू..

रेल्वे गेटातील रूळ ओलांडून प्रवास करणाऱ्यानां कामयानी गाडीने जोरदार धडक दिल्याने अपघात घडला

पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथे रेल्वे गेटातील रूळ ओलांडून प्रवास करणाऱ्यानां कामयानी गाडीने जोरदार धडक दिल्याने अपघात घडला आहे. यात एकाच गावातील रत्नाबाई माधव पाटील (55, दुसखेडा), अशोक झेंडू पाटील (65, दुसखेडा) दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहॆ.

रेल्वे रूळ ओलांडताना दुर्घटना..

परधाडे येथे हरीनाम सप्ताह असल्याने दुसखेडा गावाजवळील रेल्वे क्रॉसिंग ओलांडून सप्ताहासाठी काही महिला व पुरूष जात असताना त्याचवेळी अचानक रेल्वे आली व रेल्वेची धडक बसल्याने अशोक पाटील व रत्नाबाई पाटील यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पाचोरा पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवले असून या घटनेने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे