आपल खान्देश

शिरसोलीत व्हाट्सअप स्टेटसवरून भडकला वाद, दगडफेकित वाहनांच्या काचा फुटल्या!

स्थानिक पोलिसांनी वेळीच धाव घेत हस्तक्षेप करून वाद मिटवीण्यात त्यांना यश आले

झूम मराठी

जळगाव (झूम मराठी) शिरसोली गावात एका तरुणाने सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसवरून दोन गट एकमेकांन समोर भिडले आणि वादाची ठिणगी पडली. वादाचे पर्यवसान हाणामारीत आणि नंतर दगडफेक झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी वेळीच धाव घेत हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टाळला. दरम्यान, दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाले असून एक तरुण जखमी झाला आहे.

दगडफेकीत रहीस युसुफ मणियार यांच्या मालकीची एमएच.१९.सीवाय.२७९९ आयशर ट्रक व डॉ.सुफीयान शाहा यांच्या मालकीची चारचाकी क्रमांक एमएच.०३.एआर.१५०८ च्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर अहमद अखिल पिंजारी वय-१८ हा तरुण रस्त्याने मलीक नगरमध्ये जात असताना डोक्याला दगड लागल्याने जखमी झाला आहे. 

आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला मराठी शाळेच्या मोकळ्या मैदानात काही तरुणांनी मारहाण केली, यात काही तरुणांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. वाद शांत झाल्यावर अफवा पसरवून काही तरुणांनी मलीकनगर व नशेमन कॉलनीत काही समाजकंटकांनी दगडफेक केली. मात्र शिरसोली गावात हनुमान जंयती निमित्त पोलीस बंदोबस्त असल्याने एमआयडीसी पोलीस लागलीच घटनास्थळी पोहोचले यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे