आपल खान्देश

स्थानिक एस टी बस सेवा सुरु करण्यासाठी पाचोरा शहर मनसेचे निवेदन

Pachora Live24 @ City Reporter

पाचोरा (प्रतिनिधी )करोना प्रादुर्भावामुळे स्थानिक एसटी सेवा बंद करण्यात आली असल्याने. नागरिकांच्या हितास्तव स्थानिक एस टी बस सेवा सुरू करण्यात याव्यात, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने पाचोरा आगार प्रमुखांना देण्यात आले.

ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिक प्रवासी ग्रामस्थ यांना सुरक्षित जाण्या-येण्यासाठी आज बस सेवा चालू होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यात बस सेवा चालू नसल्याने ग्रामीण भागात दैनंदिन वृत्तपत्र, पत्रव्यवहार, टपाल सेवा, शासकीय दस्तऐवज आदी सेवांची सातत्याने गैरसोय होत आहे. शहरांत गावोगावातील लोक दवाखाण्यात भरपुर कामाला आहे. परंतू जाण्यायेण्यासाठी बस नसल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा तर्फे विद्यार्थी व नागरिकांच्या हितास्तव स्थानिक बससेवा सुरू व्हावी म्हणून पाचोरा आगारप्रमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शुभम अशोक पाटील,प्रशांत पाटील,प्रफुल्ल संजय एरंडे,नयन पाटील,हर्षल पाटील,तुषार नैनाव,आदेश पाटील, आदी मनसैनिक उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे