ब्रेकिंग

ताप, खोकला, सर्दी व लहान मोठ्याना घशाचे इन्फेकशन या व्हायरल लागणने पाचोरेकर त्रस्त!

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असतानाच शहरांमध्ये खोकला, सर्दी व लहान मुलांच्या घशात इन्फेकशन व व्हायरल ताप अंगदुखी सर्वांशी डोकेदुखी ठरलेला व्हायरल ताप यांचे रुग्ण दिसून येत आहेत. 

झूम मराठी पाचोरा – पाचोराशहरांत खोकला, सर्दी व लहान मुलांचे घशाचे इन्फेकशन, अंगदुखी व व्हायरल तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. यामुळे नेमका हा आजार काय आहे, हा प्रश्न रुग्णांसह वैद्यकीय क्षेत्रालाही पडला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असतानाच शहरांमध्ये खोकला, सर्दी व घशाचे इन्फेकशन व व्हायरल ताप अंगदुखी सर्वांशी डोकेदुखी ठरलेला व्हायरल ताप यांचे रुग्ण दिसून येत आहेत. विशेष म्हणजे एकाला ताप आल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांनाही याची लागण होत आहे. पाचोरा शहरांत घरोघरी या साथीचे रुग्ण मोठ्या संख्येने दिसून येत आहेत.

खोकला, सर्दी व लहान मुलांच्या घशाचे इन्फेकशन, ताप येणे, अंगदुखी अशी लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. डासांच्या उत्पत्तीला सध्याचे वातावरण पोषक असल्यामुळे या साथीच्या आजारांना खतपाणी मिळत असल्याचेही वैद्यकीय क्षेत्रातून सांगितले जात आहे.

पाचोरा आरोग्य प्रशासनाने तातडीने लक्ष घालुन याबाबत चौकशी करुन व रूग्णांची तपासणी करून – योग्य उपचार व यासंदर्भातील माहिती प्रदर्शीत करून जन जागृती करावी अशी मागणी होत आहे.

पाचोरा नगरपालिका आरोग्य प्रशासनाने तातडीने लक्ष घालुन याबाबत चौकशी करुन व रूग्णांची तपासणी करून – योग्य उपचार व यासंदर्भातील माहिती प्रदर्शित करावे. जेणेकरून नागरीकांमधील चिंतेचे व भीतीचे सावट दुर होईल? नागरीकांनी कोणकोणती काळजी घ्यावी व उपाययोजना करावी याबाबत जनजागृती करावी हि अपेक्षा सोशल मीडियावर जोर धरताना दिसत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे