रक्षाबंधन राखीला हात द्या बहिणीला साथ द्या.. शिवसेनेच्या वैशालीताई सुर्यवंशी यांची हाक
पाचोरा भडगाव मतदार संघाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या & स्व. आमदार तात्यासाहेब आर ओ पाटील यांची कन्या वैशालीताई सुर्यवंशी या शिवसेनेत सक्रीय झाल्या पासून अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामान्य जनतेचे लक्ष वेधत आहॆत.
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळख असलेल्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्याकडे मतदार संघ आशेचा किरण म्हणुन पहात आहे. निष्ठावंत शिवसैनिकासाठी ताई काम करत असून ताईंनी देखील तळागळातील जनते संपर्क करण्यात & योग्य वेळी योग्य पाऊल उचलुन जशास – तसे योगदान देण्यास मागे नाही हे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वानी बघीतले आहेच अशा एक ना अनेक प्रश्न- उपक्रमापैकी वैशालीताई सुर्यवंशी यांनी रक्षा बंधनाचे औचित्य साधुन भाऊ-बहीणीच्या नात्याला बळकटी देण्यासाठी जरूर या अशी हाक देत “राखीला हात द्या, बहिणीला साथ द्या” दि. 30 ऑगष्ट 2023 बुधवार रोजी पाचोरा येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात सकाळी 9-00 वाजता तर भडगाव येथे दुपारी 02 ते 4 वाजता भडगाव शिवसेना शिवतिर्थ कार्यालय बाळद रोड येथे येण्याचे आवाहन केले आहे तरी जनतेने जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पाचोरा- भडगाव शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.



