आपल खान्देशब्रेकिंग

जामनेरच्या भवानी घाटात चारचाकी व दुचाकी वाहनाचा अपघातात, पाचोऱ्याचा तरुण ठार तर पाच जण गंभीर जखमी..!

जामनेर शहराजवळील भवानी घाटात चारचाकी व दुचाकी वाहनाचा भीषण अपघातात शिरसाळा मारूती दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली आहे. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, शनिवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी बोदवडकडून ४ चाकी वाहन जामनेर कडे येत होते तर पाचोरा तालुक्यातील पुंनगाव येथील तिघेजण शिरसाळा मारुती मंदिरात दर्शनासाठी जात असताना रामवन मंदिरा समोर रस्त्यावर दोघे वाहन समोरासमोर अपघात झाला. या अपघातात अर्जुन सुकलाल जाधव या तरुणाचा मृत्यू झाला. तर विनोद सुरवाडे व तुषार संतोष जामदार पाचोरा पुंनगाव हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन नाल्यात जावून पडल्याने कारमधील गीतांजली सुहास बांगर, वंदना माधव दांभोरे, प्राजक्ता विठ्ठल आसुदे रा. छत्रपती संभाजीनगर हे जखमी झाले. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे