Pachora | पाचोऱ्यात चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लोखंडी टॉमीने मारहाण..
पाचोरा शहरातील जारगाव चौफुली जवळ एका दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने दुकानाचे शटर तोडत असलेल्या एका आरोपीने रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस नाईक सचिन पवार यांचेवर डोक्यात टामी मारत प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून रक्तबंबाळ अवस्थेत असून देखील पोलीस नाईक सचिन पवार यांनी धेर्य दाखवत आरोपीला पकडून ठेवत जेरबंद
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दिलीप पाटील आणि पोलीस नाईक सचिन पवार हे गस्तीवर होते. जारगाव चौफुली जवळ एका दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने दुकानाचे शटर तोडत असलेल्या एका आरोपीने रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस नाईक सचिन पवार यांचेवर डोक्यात टामी मारत प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून रक्तबंबाळ अवस्थेत असून देखील पोलीस नाईक सचिन पवार यांनी धेर्य दाखवत आरोपीला पकडून ठेवत जेरबंद केले, अशोकसिंग बावरी या संशयित आरोपीने पोलीस कर्मचारी सचिन पवार यांच्यावर लोखंडी टॉमीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. यासंदर्भात पो हे कॉ दिलीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोकसिंग ईश्वरसिंग बावरी याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ करीत आहे.


