पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पत्रकार विरोधी हल्ला कायदा परिषद, पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांचा सहभाग व पुरस्काराने सन्मानीत केले जाणार..
पाचोरा (झूम मराठी) पिंपरी- चिंचवड एडिटर्स गिल्ड आयोजित पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषद व पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील पत्रकारांचा गौरव समारंभ मनसेचे राज ठाकरे यांच्या हस्ते दि. 19 ऑगष्ट शनिवार रोजी सकाळी 9-00 वाजता ग.दि. माडगुळकर सभागृह निगडी येथे तिन सत्रात आयोजित करण्यात आला आहे.
प्रथमसत्र मी आणि पत्रकार हक्काची लढाई या चर्चा सत्रात पुणे दै.पुढारी संपादक सुनिल माळी, पुणे दै. सकाळ संपादक सम्राट फडणीस, पुणे टाईम्स मिरर/ सीविक मिरर संपादक अविनाश थोरात, पुणे दैनिक लोकमत संपादक संजय आवटे, पाचोरा पत्रकार संदीप महाजन, गडचिरोली लोकमत न्युज 18 महेश तिवारी यांचा सहभाग असणार आहे यावेळी प्रमुख उपस्थिती पिंप्री- चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, खासदार श्रीरंगआप्पा बारणे (मावळ), आमदार महेशदादा लांडगे (भोसरी), भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार आण्णा बनसोडे (पिंपरी- चिंचवड) आमदार विलास लांडे (भोसरी), राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, नगरसेवक विठ्ठलनाना काटे, नगरसेवक राहुल कलाटे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दुसऱ्या सत्रात म.न.से.पक्ष प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते मुंबई दैनिक महाराष्ट्र टाईम्स संपादक पराग करंदीकर , मुंबई Lokशाही संपादक कमलेश सुतार , ABP माझाचे राहुल कुळकर्णी, जेष्ट पत्रकार अव्दैत मेहता, वऱ्हाड दै पुण्यनगरी संपादक अनिल मस्के, डिजीटल मिडीयाचे पत्रकार अमित मोडक, पाचोरा येथील साप्ता.झुंज & ध्येय न्युज यु. ट्युब, वेब न्युजचे संपादक संपादक संदीप महाजन, यवतमाळ दैनिक लोकमतचे अविनाश खंदारे, महाराष्ट्र न्युज स्टेट असो. एडिटर अश्विनी सातव- डोके, पुणे पोलिसनामचे संपादक नितीन पाटील, पुणे दैनिक पुढारीचे आशिष देशमुख , गडचिरोली न्युज 18 चे महेश तिवारी, पिंपरी- चिंचवड न्युज 18 चे गोविंद वाकडे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तिसऱ्या भागात पत्रकार हल्ला विरोधी कायदा वास्ताव आणि गरज या चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असुन यामध्ये मुंबई दैनिक महाराष्ट्र टाईम्स संपादक पराग करंदीकर , मराठी टाईम्स नॉऊ संपादक मंदार फणसे , BBC मराठी संपादक आशिष दिक्षित, मुंबई Lokशाही संपादक कमलेश Asked , मुंबई दै सकाळचे ब्युरोचिफ विनोद राऊत, ABP माझाचे राहुल कुळकर्णी यांचा सहभाग असणार आहे याकार्यक्रमाचे सुत्रसंचालक लेखक- निवेदिका प्रा. वसुंधरा काशीकर करणार असुन सर्व पत्रकारांनी सदर समारंभास उपस्थित राहवे असे आवाहन पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्डच्या वतीने करण्यात आले आहे.




