आपल खान्देश

पाचोरा शहरातील श्री संत सेना नाभिक समाज बहुउद्देशीय मंडळाची सर्वसाधारण सभा आणि विद्यार्थी गुणगौरव संपन्न..


पाचोरा (झूम मराठी) पाचोरा शहरातील नाभिक समाजाची सर्वसाधारण सभा विद्यार्थी गुणगौरव सोहळा श्री गजानन महाराज मंदिर पुनगाव रोड पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाली. सभेचे कोरम अभावी सभा तहकूब करून काही वेळानंतर तेथेच सभा घेण्यात आली. तसेच समाजातील मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अँड बापूसाहेब शांतीलाल सैंदाणे हे होते. तसेच सभेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला व समाजाचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी त्यांच्या कार्यकारिणीत नवीन सदस्यांची निवड केली. निवड केलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे अनिल श्रावण अहिरे, योगराज काशिनाथ सोनवणे, सुखदेव संतोष वाघ, गुलाब बारकू ठाकरे,कृष्णराव अर्जुन वाघ, कैलास भास्कर अहीरे, विकास अशोक पगारे, जगन्नाथ बारकू सोनवणे,मांगो वना राऊत,शरद गजानन अहीरे, सुनील श्रावण अहिरे, सौ.शोभा रमेश जाधव यांची निवड करण्यात आली.

तसेच अध्यक्षांनी सांत्वन भोजन योजना संस्थेमार्फत घोषित केले तसेच संस्थेचा कार्यकाळ ५ वर्षा ऐवजी ३ वर्षाचा करण्यात आला तसेच नवीन सभासद फी फक्त १२६ रुपये ठरविण्यात आली. वरील तीन वर्षाचा कार्यकाळ व सभासद फी संस्थेच्या नियमावलीत बदल करून मा.धर्मआयुक्त सो जळगाव यांच्या आदेशाने पारित करण्यात येईल कार्यक्रमास ऑल इंडिया सेन नाभिक समाज ट्रस्ट नवी दिल्लीचे कार्यकारणी सदस्य तथा महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई प्रदेश संघटक श्री रविंद्र बोरणारे व अॅड.बापूसाहेब सैंदाणे यांनी समाज प्रबोधन विषयक मार्गदर्शन केले. व संस्थेस भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या तसेच जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजू भाऊ मोरे जेष्ठ समाजसेवक भास्कर हरी सन्नांसे, रमेश शंकर सोनवणे, ज्ञानेश्वर भगवान वाघ, नामदेव पांडुरंग अहीरे, सौ. कल्पना अनिल अहीरे, सौ.सुनिता संजय जाधव व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे