आपल खान्देशमहाराष्ट्र

देवळाली-भुसावल शटल लवकरच धावणार पूर्वनिर्धारित वेळेनुसार, खा उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमोल शिंदे यांची शिष्टमंडळाला भेट

मनमाड ते भुसावल दरम्यान दररोज ये-जा करणारे प्रवास्याचें प्रचंड हाल झाले होते. प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन दिल्लीत रेल्वेच्या शिष्टमंडळा भेटीत सांगितले

जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह पाचोरा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे व रेल्वे बोर्डाचे चेअरमन अनिल कुमार लाहोटी यांची  दिल्लीत भेट घेतली.  शिष्टमंडळाला शटल रेल्वे पूर्वनिर्धारित वेळेनुसारच सुरू बाबत आश्वासन दिले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खान्देशातील प्रवाशांच्या सोयीची शटल रेल्वे सेवा म्हणजेच देवळाली-भुसावल एक्सप्रेसच्या वेळेत कोरोना काळात बदल झाला होता. परिणामी मनमाड ते भुसावल दरम्यान दररोज ये-जा करणारे प्रवासी, नोकरदार व चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले होते. प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन खासदार उन्मेषदादा पाटील व पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांचे सह पाचोरा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य तथा प्रवासी परिषदेचे जनरल सेक्रेटरी प्रभू पाटील, सल्लागार सदस्य गिरीश बर्वे, अनिल चांदवानी, राजेंद्र बडगुजर, निलेश कोटेचा यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे व रेल्वे बोर्डाचे चेअरमन अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेतली. या भेटीत देवळाली- भुसावल शटल च्या मागणीबाबत लोकसभेचे अधिवेशन संपल्यावर लगेचच होणाऱ्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले. यावेळी प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळी निवेदने मान्यवरांना देण्यात आली, या निवेदनावर उपरोक्त उपस्थित सदस्यांसह हिरालाल चौधरी, अॅड. प्रशांत नागणे, प्रदीपकुमार संचेती, राजू धनराळे व प्रमोद सोमवंशी यांच्यासह अनेक प्रवासांच्या स्वाक्षरी आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे