आपल खान्देशकृषीवार्तामहाराष्ट्र

Pachora | संयुक्त राष्ट्र संघाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून केले जाहीर.


पाचोरा (झूम मराठी वृत्त) संयुक्त राष्ट्र संघाने ‘२०२३’ हे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून  पाचोरा तालुका संचलित गो से हायस्कूल मध्ये आज चाललेल्या कार्यक्रमात जाहीर केले त्यानिमित्ताने श्री गो से शाळेत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यां विषयी जागरूकता निर्माण करण्यात आले.

तृणधान्यां विषयी व्याख्याते म्हणून पाचोरा नगरिचे प्रसिध्द डॉक्टर गोल्ड मेडलिस्ट “आयुर्वेदाचार्य, डॉ. संजय जी माळी ,(श्रीहरी आयुर्वेद चिकित्सालय, पाचोरा.) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आहारातील तृणधान्याचे महत्त्व पटवून दिले. वाढते फास्ट फुडचे प्रमाण आरोग्यासाठी कसे घातक आहे हे ही विद्यार्थ्यांसमोर त्यांनी मनोरंजक पद्धतीने मांडले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आमच्या शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. प्रमिलाताई एम.वाघ मॅडम यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन पौष्टिक आहाराचे महत्व पटवून दिले. व्यासपिठावर या कार्यक्रमाला ज्यांचे अनमोल मार्गदर्शन आम्हाला लाभले ते आमच्या शाळेचे मा. उपमुख्याध्यापक एन. आर. ठाकरे , पर्यवेक्षिका सौ ए. आर. गोहील , ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस.एस.पाटील , उपस्थित होते.मंचावर उपस्थित संजय पी.करंदे सर, सुबोध एम. कांतायन, या द्वयबंधूंनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनमोल सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस ए पवार यांनी तर आभार सौ.एस.व्ही.साळुंखे यांनी केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे , शिक्षकेत्तर कर्मचारी बंधूंचेही विशेष सहकार्य लाभले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे