आरोग्य व शिक्षणसखी

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेतर्फे महिला कोरोना योध्दयांचा विशेष सन्मान 

जागतिक महिला दिना निमित्त शाळेचा विशेष उपक्रम


झूम मराठी

भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेतर्फे “जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून महत्वपूर्ण कामगिरी बजावली अशा महिला कोरोना योध्दयांचा विशेष सन्मान व त्यांच्या कार्याची प्रशंसा आज लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेतर्फे करण्यात आली 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका संगिता शेलार ह्या होत्या… या प्रसंगी या सुरेखा अर्जुन कोळी (आशा वर्कर) वैशाली प्रमोद कासार (आशा वर्कर) मीना अरुण पाटील (मदतनीस) प्रभावती प्रकाश महाजन(अंगणवाडी सेविका), वसुंधरा विलास पवार- (अंगणवाडी सेविका), जयश्री विजय पाटील (आशा वर्कर) या महिला कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता आपली कामगीरी चोख बजावून नागरिकांचे प्राण वाचवले अशा महिला कर्मचाऱ्यांचे महिला दिना निमित्त विशेष सन्मान शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे व इतर शिक्षकांमार्फेत करण्यात आला..तसेच त्यांच्या कार्याविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सन्मानार्थी वैशाली कासार यांनी अतिशय ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांनी आपले आई वडीलांचे आपल्या आयुष्यातील किती मोलाचे स्थान असते हे अधोरेखित केले..शाळेच्या वतीने महिला शिक्षिका संगिता शेलार,सुनिता देवरे,अनिता सैंदाणे यांचा देखील विशेष सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला..

सदर कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगिता शेलार,सुनिता देवरे,अनिता सैंदाणे,अनंत हिरे, सुयोग पाटील, चंद्रकांत पाटील ह्यांनी विशेष परिश्रम घेतले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे