आपल खान्देश

Pachora | महाराष्ट्र राज्य महावितरण मंडळाचा स्थापना दिनानिमित्ताने युवा सेनेने वीज कर्मचारीचां केला सत्कार

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

पाचोरा (प्रतिनीधी) शहरात शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य महावितरण मंडळाचा स्थापना दिनाचे औचित्य साधून पाचोरा शहरातील महावितरण कार्यालय येथे कर्तव्यदक्ष अधिकारी कार्यकारी अभियंता सखाराम थानवी. अती कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण व उपकार्यकारी अभियंता पंचाळ सोबत सर्व महावितरण कर्मचाऱ्यांचा पाचोरा युवा सेना तर्फे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

यावेळी युवासेना उप जिल्हा प्रमुख संदीप जैन यांनी सांगितले की महावितरण कर्मचारी रात्री बे रात्री उठून देखील आपल्या जीवाची परवा न करता सेवा देतात आणि आपला समाजाचाही काही देणं लागतं आणि याच हेतूने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आदर्श घेऊन 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या बिद्र वाक्याखाली काम करत असून. आपण युवा सेना तर्फे आज महावितरण स्थापना दिवसाच्या निमित्ताने सर्व महावितरण कंपनीचे मनापासून आभार मानतो आपण चांगल्या प्रकारे सेवा बजावत आहात यापुढेही असेच काम करत रहा हीच अपेक्षा बाळगतो. यावेळी तालुका प्रमूख भूपेश सोमवंशी, अँड गौरव पाटील, युवा सेना शहर प्रमुख हरीश देवरे, शहर संघटक प्रशांत सोनार, महेंद्र पाटील सचिन खरे, अनिकेत पाटील, सचिन पाटील तुषार पाटील, मिलिंद खरे सर्व युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे