आपल खान्देशगुन्हेगारी

घृणास्पद – चाळीसगाव शहरात सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार..

चाळीसगाव (झूम मराठी) चाळीसगाव शहरातील सात वर्षीय चिमुकलीला घरी सोडतो असा म्हणत एकांत ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला अटक करण्यात आली आहॆ.

चाळीसगाव शहरात ७ वर्षीय चिमुकली वास्तव्यास आहे. “घरी सोडून देतो” असे सांगून संशयित आरोपी आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील (वय-२९) रा. नारायणवाडी, चाळीसगाव याने स्कुटीवर बसून तिला शहरातील टेनिस ग्राउंड येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. चिमुकली रडू लागल्याने तिला घरी सोडून देऊन “तू जर आई-वडिलांना सांगितले, तर तुला मारून टाकेल” अशी धमकी दिली.

दरम्यान आपल्यावर झालेला प्रसंग चिमुकलीने तिच्या आईजवळ कथन केला. ही धक्कादाय घटना घडल्यानंतर पीडित मुलीसह तिची आई यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी सुपड्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे