आपल खान्देश

कर्नाटकात कॉंग्रेसला निर्विवाद विजय मिळाल्याने, पाचोऱ्यात जल्लोष करत पेढे वाटप करण्यात आले

पाचोरा (प्रतिनिधी) –  कर्नाटकात कॉंग्रेसची निर्विवाद सत्ता बसल्याने देशभरात काँग्रेस मध्ये चैतन्य निर्माण झाले असून पाचोरा कॉंग्रेसने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी ढोल-ताशा फटाक्यानी जल्लोष करत पेढे वाटप करण्यात आले.

भाजपा ला कंटाळून महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी याच्या विरोधात कर्नाटक च्या जनतेने कॉंग्रेस ला एकहाती सत्ता देत लोकशाही ला माननारे राज्य असल्याचे सिद्ध केले आहे. या कॉंग्रेस च्या विजयाचा जल्लोष पाचोरा कॉंग्रेस ने केला आहे. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला तर ढोल-ताशा वाजवुन पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंनद साजरा केला. तर शहरातील नागरिकांना पेढे वाटण्यात आले. यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, महीला जिल्हा प्रतिनिधी अॅड मनिषा पवार,शंकर सोनवणे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, ओबीसी सेल सरचिटणीस, संदीप पाटील, अल्ताफ शेख, रहीम शेख, एसी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, प्रकाश भिवसणे, जलील शाह सुभान शाह, अक्रम शेख,अकलाख शेख, जुनेद खान, जावेद खान, आसिम मौलाना, परवेज खान आदि उपस्थितीत होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे