पाचोऱ्यात महाराणा प्रताप जयंती निमित्त रक्तदान शिबीर, व मिरवणूक उत्साहात
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया @ दिलीप परदेशी
पाचोरा शहरातील जन्मोउत्सव समितीच्या वतीने महाराणा प्रताप यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करून रक्तदान शिबिराचे आयोजन महाराणा प्रताप जन्मोउत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.
पाचोरा शहरातील महाराणा चौकात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला असून संध्याकाळी महाराणा चौकातुन मिरवणूक काढण्यात आली.

महाराणा प्रताप जन्मोउत्सव समितीचे अध्यक्ष पप्पु राजपुत, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर रुद्र राजपूत, एस बी पाटील, अरुण पाटील पंकज पाटील, सुधीर पाटील, प्रदीप पाटील, सतीष राजपूत, अजय राजपुत, टिलु राजपूत, उपेंद्र पाटील, मोहीत राजपूत, स्वरूप राजपूत, नितीन राजपूत, मनोहर महाले, सुनील राजपूत, सतीश राजपूत, देवा राजपूत संतोष राजपूत, नारायण राजपूत, गणेश पाटील यांनी हा कार्यक्रम यशस्वी रित्या आयोजन करून यशस्वी करून दाखवला.
महाराणा प्रतापसिंग हे मूळचे राजस्थानचे, असे असले तरी महाराष्ट्रात त्यांची जयंती तितक्याच उत्साहात साजरी केले जाते. मोघल बादशहा अकबराने राजस्थानमधील अनेक संस्थानांवर आक्रमणे केली तेव्हा काही राजांनी आपल्या मुलींचा विवाह अकबराशी लावून दिला आणि आपले राज्य सुरक्षित करून घेतले. परंतु महाराणा प्रताप यांनी अकबराच्या हाताखाली राज्य करण्यास नकार दिला. त्यामुळे अकबराने महाराणा प्रताप यांच्या चितोड संस्थानावर हल्ला केला. महाराणा प्रताप यांनी आपली राजधानी गोगुंड येथे हलवली आणि मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला. गोंगुडमध्ये नवी राजधानी वसवल्यानंतर महाराणा प्रताप यांनी अभेद्य किल्ला बांधला आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज फौज निर्माण केली. अश्या महाराणा प्रताप यांची जयंती 9 मे रोजी मोठ्या उत्साहात पाचोरा शहरात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली गेली



