ब्रेकिंग

जळगाव पाचोरा हायवे वर हडसन गावा नजीक अपघात..

झूम मराठी

जळगाव पाचोरा हायवे वर हडसन गावा नजीक अपघातात एक जागीच ठार झाल्याची माहिती. आज  रात्री नऊ वाजेच्या सुमारास जळगाव पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर हडसन गावानजीक मोटार सायकलचा अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली असून सदर अपघातामध्ये एक इसम जागीच ठार झाला आहे, बाकी जखमी यांना शिवसेनेचे एम्बुलेंस चालक निळू भाऊ यांच्या रुग्णवाहिकेमध्ये पाचोरा येथे पाठवण्यात आले आहे.

सदर इसम डोमगाव येथील रहिवाशी होता. समोरून येत असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने मंगल भिल याचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश भिल याच्या चेह-यावर गंभीर जखम झाली असून त्याला पाचोरा येथे शिवसेनेच्या अंबूलन्स चे चालक निळू पाटील यांनी घेवून दाखल केले आहे. घटनास्थळी हडसण येथील राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रविण सोनार व ग्रामस्थांनी मदत केली. पाचोरा पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ राहूल मोरे, निलेश गायकवाड नितिन सुर्यवंशी, दिपक सुरवाडे यांनी घटनास्थळी भेट दिवून मदतकार्य केले. नुकत्याच झालेल्या जळगाव चांदवड रस्त्यावर ठिकठिकाणी काम अपूर्ण असल्याने त्या ठिकाणी अपघात संख्या वाढत असून या कडे संबंधित विभागाने लक्ष्य देणे गरजेचे झाले आहे. हा अपघात सूध्दा हडसण गावाजवळ अपूर्ण राहिलेल्या जागी झाला आहे. अश्या अपूर्ण राहिलेल्या ठिकाणी अजून किती वाहनचालकांना जिवगमवावा लागेल याकडे प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे