महाराष्ट्र

तृतीयपंथी सपना अडकली विवाह बंधनात, बीडमधील बाळूसोबत थाटात पार पडला लग्न सोहळा!

झूम मराठी वृत्तसेवा

बीड (वृतसंस्था) बीडमधील तृतीयपंथी सपना आणि ढोलकी वाजवणारा बाळू आज विवाह बंधनात अडकले आहेत. बीडमधील कंकालेश्वर मंदिरात सपना आणि बाळूचा मोठ्या धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे बाळू आणि तृतीयपंथी सपना आजपासून आयुष्यभरासाठी सोबती बनले आहेत.

  पारंपारिक धार्मिक विधीनुसार सपना आणि बाळूचा विवाह सोहळा पार पडला. संपूर्ण मंगलाष्टिका झाल्यानंतर बीडमधील पत्रकार आणि सामाजिक संस्थेमधील लोकांनी सपनाचं कन्यादान केलं.

काल सपनाच्या घरी धार्मिक परंपरेनुसार हळदीचा सोहळा उत्साहात पार पडला. या हाळदीच्या सोहळ्यासाठी सपनाच्या घरासमोर मंडप उभारण्यात आला होता. याच मंडपात चौक भरला आणि या चौकावर सपना आणि बाळूला हळद लावण्यात आली होती.

सपना-बाळूची प्रेमकहाणी

बाळू आणि सपनाची प्रेमकहाणी संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरत आहे. बाळू तोडमल हा तरूण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये ढोलकी वाजवण्याचे काम करतो. अशाच एका जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीय सपनाशी बाळूची भेट झाली. सपना ही मुळची बीडची असून कार्यक्रम संपवून बाळू आणि सपना एके दिवशी बीडमध्ये पोहोचले. बाळूला गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा गाडी नव्हती. यासाठी तो सपना सोबतच थांबला आणि इथूनच सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी सुरू झाली. ही प्रेमकहाणी सत्यात उतरत उद्या सपना आणि बाळू आयुष्यभरासाठी एकमेकांचे होणार आहेत. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे