आपल खान्देश

Pachora | पाचोऱ्यात रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरचे टायर फुटल्याने चालक जागीच ठार..


पाचोरा (झूम मराठी) पाचोरा शहरात गिरणा नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने भडगाव रोड वरील हॉटेल स्वप्नशिल्पच्या समोरील दुभाजक वर आदळल्याने ट्रॅक्टर पल्टी होऊन चालकाच्या डोक्याला जबरी मार लागला. वाहन चालक वय वर्ष २०  युवक जागीच ठार झाला. घटनेप्रकरणी पाचोरा येथील ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अपघातात तुटलेला खांब व वाळू दुसऱ्या वाहनात भरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून..

अपघाताची घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान भडगाव रोडवरील हाॅटेल स्वप्नशिल्प समोर घडली. मयत युवकाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. यावेळी संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते. चिंचखेडा खु” तालुका पाचोरा येथील पवन हिम्मत पाटील (वय – २०) वर्ष हा कृष्णापूरी येथील एका इसमाचे ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान गिरणा नदीपात्रातून वाळू भरुन पाचोरा शहराकडे भरधाव वेगाने येत असतांना हॉटेल स्वप्नशिल्प समोर अचानक टायर फुटला त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॉक्टर चांदवड – जळगाव महामार्गावरील इलेक्ट्रीक खांबावर आदळले त्यात पवन हिम्मत पाटील यांच्या डोक्याला व चेहऱ्याला जबरी मार लागला त्यात पवन हा जागेवर ठार झाला. घटनेची माहिती ट्रॅक्टर मालक व त्यांचे काही त्याचे साथीदारांना मिळताच त्यांनी तात्काळ तुटलेला खांब व वाळू दुसऱ्या वाहनात भरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पवन हा आई वडीलास एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील हिम्मत पाटील हे सारोळा बु” ता. पाचोरा येथील अविनाश देशमुख यांचेकडे मजूरी करतात. पवन यास एक बहिण व वृद्ध आई – वडील असा परिवार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे