Pachora | बाजार समितीसाठी शेवटच्या दिवशी दिग्गजांचे अर्ज, मातब्बरांमुळे निवडणूक लक्षवेधी ठरणार.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मातब्बर उमेदवारांमुळे बाजार समितीची निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र तालुक्यामध्ये दिसून येत आहे. 19 जागांसाठी 234 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीसाठी शेकडो अर्ज दाखल झाल्याने अर्ज माघारी घेण्याच्या वेळी नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव ठाकरे गट , तसेच शिवसेना, भाजपाच्या पॅनलातील चाचपनी केलेल्या उमेदवारांनी कागदपत्रांची जुळवाजुळ करीत वेळ कळणार नाही याची काळजी घेत इच्छुकांची लगबग सुरू होती, अखेर 19 जागांसाठी 234 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अपक्ष व पक्षातील उमेदवारांची पुढची दिशा ठरेल.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 5 एप्रिल 2023 रोजी होणार असून त्यात किती अर्ज अवैध ठरतात. हा विषय पुस्तके चा भाग ठरला असून माघारी साठी मोठा अवधी देण्यात आला आहे. 21 एप्रिल ला चिन्ह वाटप केल्यानंतर पॅनलच्या निर्मितीची घोषणा त्याने प्रमुख करतील.



