कृषीवार्तामहाराष्ट्र

Panjab Dakh Havaman Andaj | राज्यात 10 दिवस इथे गारपिटीसह पावसाळ्या सारखा पाउस कोसळणार – पंजाब डख यांचा हवामान अंदाज..

राज्यात पुढील दहा दिवस म्हणजेच दिनांक 24 एप्रिल ते दोन मे पर्यंत विजा गारपीट वारे यासह मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान अभ्यासात पंजाब डक यांनी दिलेला आहे.

एकंदरीत दिनांक 24 एप्रिल ते 2 मेपर्यंत राज्यामध्ये येणारा पाऊस हा गारपिटीचा असेल आणि त्यामुळे सर्वांनी स्वतःचं पिकाचे आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी असे आवाहन पंजाब यांनी केले आहे. पंजाबराव ढक यांनी दिनांक 21 तारखेला दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये गारपिटीचा पाऊस पाहायला मिळणार आहे आणि होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचा आवाहन करण्यात येत आहे. 

सर्वानी 24 एप्रील पासून 2 मे दहा दिवस विजा वारे पाउस गारपिठ या पासून स्वःतची पाळीव प्राणी, हळद, इतर पिके काळजी घ्यावी कारण 24 एप्रील पासून राज्यात भाग बदलत 2 मे पर्यंत दहा दिवस पाउस पडणार आहे तरी अंदाज लक्षात घेउन शेतीचे कामे करून घ्यावी. 

महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये दिनांक 22 एप्रिल ते दिनांक 30 एप्रिल या तारखे मध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे तर काही ठिकाणी गारपीट आणि पावसाची शक्यता सुद्धा विजांच्या कडकडाट असून निर्माण होताना दिसून येत आहे.

मराठवाड्यातील संभाजीनगर धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड जालना व लातूर या सात जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्यामार्फत वर्तवण्यात आलेला आहे. दिनांक 25 एप्रिल 2023 ते दिनांक 30 एप्रिल 2023 यादरम्यान या मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये भाग बदलत विजांचा कडकडाट आणि गारपीटी सह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज परतवण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर व त्यासोबत दक्षिण महाराष्ट्रातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिनांक 26 एप्रिल 2023 ते दिनांक 30 एप्रिल 2023 या चार दिवसांच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज गारपिटीसह निर्माण होत आहे.

https://youtu.be/7c_FhamcX8U

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे