आपल खान्देशमहाराष्ट्र

नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथे महापुरुषांच्या जयंती निमित्ताने प्रवचन व समाज प्रबोधन कार्यक्रम होणार..


नांदगाव – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथे महापुरुषांचा जयंती उत्सव 2023 अंतर्गत महापुरुष जीवन संदेश अभियान अंतर्गत(त्रीशताब्दी) छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्र निर्माता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5=30 वाजता प्रवचन व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आधार बहुउद्देशीय संस्था नांदगाव संस्थेचे सचिव एडवोकेट विद्यालय कसबे हे असणार आहेत.

   महापुरुषांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण भारतात उत्सव साजरे होत आहेत ‌ तसेच बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आणि राष्ट्र निर्माता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथे दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपासून प्रवचन व समाज प्रबोधनाचा आयोजित करण्यात आला असून. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आधार बहुउद्देशीय विकास संस्था नांदगाव संस्थेचे सचिव मा. एडवोकेट विद्याताई कसबे हे भूषविणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा.एस.एस.मडक (ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत जळगाव बुद्रुक),मा. लंकाताई शरद गिते (सरपंच जळगाव बुद्रुक),मा. कपिल तेलोरे (युवा नेते नांदगाव),मा. नितीभाऊ जाधव नगरसेवक नांदगाव नगरपालिका),मा एडवोकेट अमोल. भाऊसाहेब आहेर (न्यायडोंगरी),मा. भाऊसाहेब देवराम लाठे(निवृत्त स.पो नि.), मा. विश्वनाथ निवृत्ती कांदे (ग्रामपंचायत सदस्य),मा. एडवोकेट सागर गरुड ( मनमाड) आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणून मा. मनोजभाऊ चोपडा (शहराध्यक्ष नांदगाव काँग्रेस पक्ष),मा. आव्हाड सर (मुख्याध्यापक व शिक्षक वृंद जळगाव),मा. भैय्यासाहेब डिगोळे (मंडप डेकोरेटर्स जळगाव बुद्रुक),मा. काटकर सर ( जि.प. प्रा. शाळा जळगाव बुद्रुक),मा. अविनाश आहेर (नशाबंदी मंच नाशिक जिल्हाध्यक्ष),मा. एडवोकेट सचिनभाऊ साळवे (नांदगाव),मा. रघुनाथ सुखदेव सांगळे (ज्येष्ठ नेते जळगाव बुद्रुक),मा. प्रभाकर नथू निकुंभ (सर्पमित्र जळगाव बुद्रुक),मा.दि. प्र. काळे ( सह अभियंता नांदगाव पाटबंधारे उपविभाग),मा. देवदास अण्णा मोरे (दलित चळवळ नेता नांदगाव),मा. संजय हरलाल सांगळे (ज्येष्ठ नेते जळगाव बुद्रुक),मा. बाळू भिवा कांदे (स्कूल कमिटी अध्यक्ष जळगाव बुद्रुक),मा. अण्णासाहेब तुकाराम गीते (जयश्री ट्रान्सपोर्ट जळगाव जि.नाशिक),मा. चंद्रकांत राजाराम घुगे (रेशन दुकानदार),मा.धनराज बुरकुल (माजी सरपंच जळगाव बुद्रुक), मा. दत्तू सुखदेव अहिरे ( रोजगार सेवक जळगाव बुद्रुक),मा. मुक्ताराम बागुल (हिंदी मराठी पत्रकार संघटना नांदगाव तालुकाध्यक्ष),मा. बाबासाहेब देवराम साठे (मार्केट कमिटी),मा. बाळूबा नागुना गीते(ग्रामपंचायत शिपाई जळगाव बुद्रुक),मा. कृष्णा कपाट, मा. पोपट अहिरे, मा.हनुमान आव्हाड,मा.अभिषेक विघे (सहसंपादक प्रभाव न्यूज चैनल नांदगाव),संत रोहिदास मित्र मंडळ जळगाव बुद्रुक,मा. दादासो प्रशांतजी झाल्टे (रिपब्लिकन सेना नांदगाव),मा. सुनील आहेर (संचालक हॉटेल हिलटॉप नांदगाव), एकलव्य मित्र मंडळ जळगाव बुद्रुक, राजवाडा मित्र मंडळ जळगाव बुद्रुक, आदींची विशेष सहकारी असणार आहे.

    महापुरुषांचा जयंती उत्सव 2023 निमित्ताने महापुरुष जीवन संदेश अभियानांतर्गत त्रीशताब्दी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रनिर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंती निमित्ताने प्रवचन व समाज प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजक विश्वास कारभारी बागुल ( नाशिक जिल्हा नशाबंदी मंच नांदगाव तालुकाध्यक्ष)हे असून सूत्रसंचालन मा. विजय एकनाथ तुरकुणे (शिक्षक जिल्हा परिषद शाळा जळगाव बुद्रुक) हे करणार आहेत. नाशिक जिल्हा नशाबंदी मंच नांदगाव शाखा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ठेवण्यात आला असून या कार्यक्रमात मा. प्राध्यापक मिलिंद भालेराव (जिल्हाध्यक्ष प्रोटोन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना),मा. मुकेश नेतकर (सामाजिक कार्यकर्ते चाळीसगाव) प्रवचन दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी जळगाव बुद्रुक राजवाडा येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार असून याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे