आपल खान्देशमहाराष्ट्र

महावितरणच्या महिला टेक्नीशियनला १० हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले..

जळगाव प्रतिनिधी । घरगुती इलेक्ट्रिक मीटर कमर्शियल आणि दंड न करण्यासाठी महावितरण कंपनीच्या टेक्निशीयन अधिकार्‍याला १० हजार रूपयांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने आज रंगेहात पकडले आहे.

तक्रारदार यांचे घरगुती मिटर कमर्शियल न करता व दंड न करण्यासाठी महावितरण कंपनीत सिनीयर टेक्नीशीयन शोभना दिलीप कहाने (वय-५६) रा. पवन नगर ममुराबाद रोड यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक गोपाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आज सापळा रचून शोभना कहाने यांनी १० हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे

पालीस उपअधिक्षक गोपाल ठाकूर, पो.नि. निलेश लोधी, पोहेकॉ दिनेशसिंग पाटील, अशोक अहिरे, सुनिल पाटील, सुरेश पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ , जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर आणि प्रदिप पोळ यांनी ही कारवाई केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे