महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण

मुंबई (उदय नरे,) बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिसीद्वारे हजेरी लावली होती. महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे. महानगरपालिकेमध्ये काय काम चालते याची माहिती आता नागरिकांना सहज मिळणार आहे. तसेच मत मागताना जी लोक वाकतात ती नंतर मत मिळाल्यावर ताट होतात. तर ओळखही दाखवत नाहीत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण केल्यावर संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांची अनेक कामे असतात. परंतु ती कऱणं बाजूला राहिले साधं उत्तर मिळत नाही. अशामुळे नागरिकांच्या आयुष्यात वैफल्य येते. मत मागताना जी लोक वाकलेली असतात ती लोक मत मिळाल्यानंतर ताट होतात. ओळखही दाखवत नाहीत. अशावेळी हा जो कार्यक्रम सुरु करतो आहोत तो एक क्रांतीकारक कार्यक्रम आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई देशातील नंबर एकची महानगरपालिका आहे. ज्यांनी जनतेला साधी साधी काम महानगरपालिकेत होत असतात. जेव्हापासून मोबाईल आला आहे त्यानंतर व्हॉट्सअॅप सुरु झाले आहे. पण व्हॉट्सअॅपचे उपयोग आणि दुरुपयोग याचा फरक जाणून घेऊ, हे तंत्रज्ञान जे पुढे जात आहे. त्याचा जर उपयोग सर्वसामान्यांना होत नसले तर त्याचा उपयोग काढीचा नाही. सर्वसामान्यांच्या आयुष्यात सहजता आणण्यासाठी महापालिका तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे. हे फार कौतुकाचे काम असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे