नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 148 नामनिर्देशन पत्र दाखल..
नांदगाव (मुक्ताराम बागुल) नांदगाव तालुक्यातील नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या 18 जागांसाठी 149 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून यावेळी उमेदवारांसोबत अर्ज सादर करताना विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे आणि माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार आहेर यांनी हजेरी लावली होती. यंदाच्या होणाऱ्या बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक सरळ लढतीची असल्याने कुठल्या पॅनल मधून कोणाला उमेदवारी मिळेल याची नेमकी खात्री मिळत नसल्याने अनेक इच्छुकांनी आपल्यासाठी लॉबिंग सुरू केल्याचे या निमित्ताने दिसून आले.
दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी सोमवारी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यालयात विद्यमान आमदार सुहास कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे आणि माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार एडवोकेट अनिल आहेर हे उपस्थित होते केवळ अर्ज भरून असा निरोप असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळ करीत वेळ कळणार नाही याची काळजी घेत इच्छुकांची लगबग सुरू होती.
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 18 जागेसाठी होत असल्याने निवडणुकीमध्ये सोसायटी गटातून सर्वसाधारण जागेसाठी एकूण 81ग्रामपंचायत गटातून 48, हमाल – मापारी गटातुन 7 असे एकूण 149 उमेदवारांनी सोमवारी दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी सभापती तेज कवडे, विलास आहेर, मविप्रचे संचालक अमित पाटील,
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील, अनंत इनामदार, एकनाथ सदगीर, उदय पवार, समाधान पाटील, दर्शन आहेर, एडवोकेट अमोल आहेर, राजेंद्र देशमुख, उदय पवार, अमित नहार, बंडू पाटील, पुंजाराम जाधव, अलकाताई कवडे, मंगलाताई काकळीज, भाऊसाहेब पाटील, राजेश कलंत्री, सोमनाथ घोंगाणे, बाळ काका कलंत्री, संजय सानप, मुकुंद खैरनार, नूतन कासलीवाल, गोकुळ कोठारी, अमोल नावंदर, भास्कर कासार, निलेश हिप्पर, नितीन कवडे सचिन हिरे, राजेंद्र लाठे, शिवाजी बच्छाव, नलिनी बोरसे, अमित बोरसे, बेबीताई पगार, चंद्रकला वाकळे, हरेश्वर सुर्वे, कैलास गायकवाड, भागवत बाबळे, धोंडीराम काळे आदी उमेदवारांचा अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 5 एप्रिल 2023 रोजी होणार असून त्यात किती अर्ज अवैध ठरतात. हा विषय पुस्तके चा भाग ठरला असून माघारी साठी मोठा अवधी देण्यात आला आहे. 21 एप्रिल ला चिन्ह वाटप केल्यानंतर पॅनलच्या निर्मितीची घोषणा त्याने प्रमुख करतील.


