उद्धव ठाकरे घेणार पाचोऱ्यात सभा…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या महिन्यात 23 तारखेला जळगाव व जिल्ह्यातील पाचोरा येथे दिवंगत आर.ओ.पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण व पाचोऱ्यात सभा घेणार आहेत. पाचोरा भडगावचे स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात, त्यामुळे आता उद्धव ठाकरे पाचोऱ्यात सभा घेणार, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये एकच आनंदाची लाट पाहायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला शिंदे यांच्या बंडामुळे मोठा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वच आमदार हे मुख्यमंत्री शिंदें सोबत गेले आहेत. ज्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोरा – भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील, एरंडोलचे चिमणराव पाटील, चोपड्याचे आमदार लता सोनवणे, मुक्ताईनगरचे आमदार पाटील यांचाही समावेश आहे. यामुळे उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार व सभा घेणार असून प्रथम ते पाचोरा येथे सभा घेऊन बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करणार हे आता नक्की झाले आहे.
पाचोरा भडगावचे दिवंगत आर. ओ. तात्या पाटील हे तत्कालिन शिवसेना आमदार होते. मात्र आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांनी आपली आमदारकीची जागा किशोर आप्पा पाटील यांना दिली होती. आमदार किशोर आप्पा पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक होते म्हणून ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्याने, आता उद्धव ठाकरे गटा कडून दिवंगत आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या वैशालीताई सूर्यवंशी ह्या पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्या आहेत. भविष्यात भाऊ विरुद्ध बहीण असा सामना होणार असल्याचे पाचोरा भडगावच्या राजकारणात बोलले जात आहॆ.
उद्धव ठाकरे यांच्या जळगाव दौऱ्याची तारीख निश्चित झालेली आहॆ असे शिवसेनेच्यावतीने सांगण्यात येत आहॆ . मात्र छत्रपती संभाजी नगर नंतरची पुढची सभा ही जळगावच्या पाचोऱ्यात होणार असल्याचे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. शिवसैनिक केवळ मुंबईहून येणाऱ्या आदेशाची वाट पाहत असून आतापासूनच तयारी लागले आहेत . जळगाव व पाचोरा येथे सभा घेतली जाणार असे म्हटले जात आहे.



