आपल खान्देश

Shiv Mahapurana शिवमहापुराण कथेसाठीच्या ‘या’ मैदानाची झाली पाहणी

Shiv Mahapurana शिवमहापुराण कथेसाठीच्या ‘या’ मैदानाची झाली पाहणी

पाचोरा Pachora शहरात प्रथमच शिवमहापुराण Shiva Mahapurana कथा व महा रुद्राभिषेकाचे आयोजन पांडवकालीन पाताळेश्वर मंदिर समिती तर्फे ग्रीन एप्पल इव्हेंट्स व पत्रकार बांधव यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आलेले आहे, यात आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवत भूषण व प.पु पंडित प्रदीप जी मिश्रा सिंहोरवाले कृपा प्राप्त शिष्य पंडित संजय शर्मा उर्फ गौतम यांच्या अमृतवाणीतून सात दिवसीय कथेचे वाचन व महारुद्र अभिषेक सोहळा दिनांक 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत पाचोरा येथील अटल मैदानाजवळ केलादेवी मंदिरा बाजूला भडगाव रोड पाचोरा येथे उत्साहात भावपूर्ण भक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे, पाचोरा तालुक्यातील व जळगाव जिल्हाभरातून असंख्य भावीक या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने भाविकांची वाढती गर्दी पाहता मोठ्या मैदानाचे नियोजन आयोजकांतर्फे करण्यात येत असून पंडीत यांचे शिष्य सदस्य, मंदीर समिती सदस्य, पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत दिनांक 2 एप्रिल रोजी मैदानाची पाहणी करण्यात आली, महाराजांच्या शिष्यांनी आयोजकांना योग्य ते मार्गदर्शन करून नियोजन करण्यासंबंधी सूचना दिल्या, पाचोरा शहरात प्रथमच शिव महापुराण कथेचे श्रवण करण्याची ही संधी तालुका वासियांसाठी चालून आलेली असल्याने मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेण्याची आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे,

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे