आपल खान्देशब्रेकिंग

पहुर – शेंदुर्णी रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांची बस उलटल्याने २६ जखमी

  जामनेर (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील पहुर – शेंदुर्णी रस्त्यावर आज सकाळी शालेय विद्यार्थ्यांची बस उलटल्याने एकुण २६ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, पहुर येथून शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिर येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कूल बसचा घोडेस्वार बाबा जवळ आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास अपघात झाला. पाटा तुटल्याने स्कूल बसचा अपघात झाला असल्याची चर्चा पहुर परिसरात सुरू आहे.  माहिती मिळताच पालक, पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावले. तसेच पहुर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं.

जखमींचे नावे पुढीलप्रमाणे सायली वारूळे, घनश्याम क्षिरसागर, निशा विजु कुमावत, प्रविण विकास उबाळे, गौरव बावस्कर, प्रथमेश मोरे, धिरज बारी, शिवाजी सुनिल उबाळे, स्वप्नील समाधान क्षिरसागर, ओम संतोष कुमावत, पवन श्रीकृष्ण घोंगडे, नितीन पाटील, निलेश पाटील, सौरव राजेंद्र लहासे, प्रणव दिलीप बेलदार, अदित्य विकास देशमुख, रोहित संतोष जाधव, अदित्य राजेंद्र पाटील, कोमल बापु जाधव, डिगंबर पंडित बारी (ड्रायव्हर), मयुरी हरिचंद्र जाधव, तुषार प्रविण कुमावत, पुनम संजय जाधव, विवेक अनिल बनकर, ओम जगदीश गोंधनखेडे हे विद्यार्थी जखमी झाले असून सहा जणांना जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे