आपल खान्देशराजकीय
शिवसेना माजी आमदार दिवंगत तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या स्मृतिस्थळास कॉंग्रेस अध्यक्षांची भेट..
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील निर्मल सिड्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा शिवसेना पक्षाचे माजी आमदार दिवंगत आर ओ. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी स्मृतिस्थळाला निर्मल एंटरनॅशनल स्कुल मध्ये जाऊन स्मृतिस्थळाला पुष्पांजली वाहीली. राजकारणातील दोन तप तात्यां सोबत निस्वार्थ सबंध सचिन सोमवंशी यांनी जपले होते. आ. आर. ओ. तात्या पाटील यांच्या दोघां विधानसभा सभा निवडणुकीत पत्रकार म्हणून सचिन सोमवंशी यांचा सिंहाचा वाटा होता हे नाकारता येत नाही. श्री. सोमवंशी हे महाविकास आघाडी चे घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस चे तालुक्यातील प्रमुख पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या सोबत कॉंग्रेस सोशल मीडिया चे तालुका अध्यक्ष कल्पेश येवले देखिल उपस्थितीत होते. यावेळी श्री सोमवंशी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.



