धुळ्यात गढरी, परदेशी धनगर वधु-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न
या मेळाव्यात तब्बल 152 विवाहेच्छुकांनी नोंदणी केली व मेळाव्यात 62 मुला मुलींनी समोर परिचय दिला विवाहेच्छुकांनी नोंदणी केली.
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
धुळे (प्रतिनिधी) राज्यातील धनगर समाज बांधव नोकरी व्यवसायानिमित्त अनेक जिल्ह्यात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे आपल्या उपवर-वधूसाठी योग्य स्थळाची माहिती मिळणे कठीण जाते. त्यासाठी वधू-वर परिचय मेळाव्याची गरज ओळखून कुसुंबा येथील मांगल्य वधू-वर सूचक मंडळाने पहिल्या गढरी, परदेशी, धनगर समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. सदर मेळावा शहरातील सैनिक लॉन्स शिवतोर्थ जवळ धुळे येथे घेण्यात आला.


मेळाव्यात मुंबई, ठाणे, कल्याण धुळे कुसुंबा चाळीसगाव, मेहुणबारे शिरुड, बदरखे, मोहलाई, आखतवाडे, शिंदखेडा, नेरी, पारोळा कुंजर येथील वधू-वर उपस्थित होते. तब्बल 152 विवाहेच्छुकांनी नोंदणी केली व मेळाव्यात 62 मुला मुलींनी समोर परिचय दिला विवाहेच्छुकांनी नोंदणी केली कार्यक्रमाचे अध्यक्ष भिमराव गढरी (बडोगे) तसेच मांगल्य वधू-वर केंद्राचे अध्यक्ष महादू परदेशी तसेच प्रमुख उपस्थिती पंडित मदने, गोपाल माने, रितेश परदेशी, नरेंद्र परदेशी, सुरेश गुजेला, आण्णासाहेब खेमनार गोविंद गढरी, विठ्ठल लांडगे, संजय गढरी, छबीलाल परदेशी, नारायण परदेशी, उत्तम परदेशी, लखन गोराङ, पितांबर गढरी, जगदीश परदेशी, सुनील परदेशी, अशोक गढरी, बंसीलाल पवार, राजेंद्र गढरी, अशोक हरणे, विठ्ठल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. पंडीत परदेशी, लक्ष्मण परदेशी, सदानंद परदेशी, चंद्रशेखर सूर्यवंशी, प्रा. प्रसन्ना गढरी, राजेंद्र परदेशी, मच्छिंद्र गढरी सह अनेक समाजबांधव उपस्थिती होते. तसेच विशाल परदेशी यांनी सूत्रसंचालन केले, आभार सुनील राजे मल्हारराव होलकर प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्व समाज बांधवांचे आभार मानले.




