आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

नगरदेवळा- लोकसेवा कार्यालयाचा जनतेने लाभ घ्यावा – आ.किशोर पाटील

नगरदेवळा (झूम मराठी) पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या सोयी सुविधेसाठी लोकसेवा केंद्र व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पाचोरा-भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्या हस्ते रविवारी दुपारी १२ वाजता करण्यात आले.

प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शिवसेना पक्षाकडून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वाचा अवलंब करण्यात येत आहे. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या पक्षाने सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आवाज उठविला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्र आणि मराठी माणूस याच्यासाठी सुरू ठेवलेला लढा आजही कायम आहे. हेच गुण अंगीकारत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नगरदेवळा येथे लोकसेवा केंद्राची सुुरवात केली असून यामुळे गोरगरीब जनतेला व गरजू लाभार्थ्यांना तालुक्या सारख्या ठिकाणी वणवण भटकावे लागणार नाही शिवाय त्यांच्या वेळेची व खर्चाची देखील बचत होणार आहे या कर्यालयात नागरिकांसाठी ई-श्रम कार्ड नोदणी, आधारकार्ड, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, संजय गांधी निराधार योजना, पीकविमा योजना, शेतकरी गट, बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी बद्दल माहिती, रोजगार स्वयरोजगार बद्दल माहिती, सर्व प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती यासह अनेक लोकाभिमुख व समाज उपयोगी योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळणार आहे. दरम्यान कार्यक्रमात त्यावेळी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, सुधाकर महाजन, शिवनारायण जाधव, गणी शेट, वसंत जिभु पाटील, अविनाश कुडे, बचत गटाच्या अध्यक्षा अंजली चौहान, प्रदिप परदेशी, प्रकाश परदेशी, नुर बेग, सागर पाटील, रवींद्र पाटील, भैया महाजन, धनराज चौधरी, रोशन जाधव, सूनील महाजन, प्रदिप भोई, तसेच नगरदेवळा बाळद गटातील सर्व सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रंचालन व आभार अविनाश कूडे यांनी मानले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे