आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

करंजवन मनमाड पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न.


मनमाड (मुक्ताराम बागुल)मनमाड शहरातील पाणीपुरी योजना व यासह इतर विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. मनमाडकारांनी सुहास सारखा आमदार निवडून दिला. त्याबद्दल त्यांचे आभार. सुहास हा काम करणार असून निधी घेण्यासाठी तो भांडं देखील करतो. अशी स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमाड येथे व्यक्त केले. मनमाड शहरासाठी बहुप्रतीक्षित असलेल्या करंजवण – मनमाड पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री दादाजी भुसे, भाऊसाहेब चौधरी सर्वपक्षीय धर्मगुरू यांच्यासह राजकीय पक्षांचे नेते, शासकीय अधिकारी उपस्थित होते. 

 यावेळी बोलताना शिंदे यांनी मनमाड शहरातील महिलांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. आता त्यांना करंजवण – मनमाड या पाणीपुरवठा योजनेतून रोज मुबारक पाणी मिळेल. यासह 800 एकर जागेत एमआयडीसी देखील मंजूर केली असून पुढील महिन्यात एमआयडीसीसाठी भूसंपादन करण्याचे काम सुरू होईल यामुळे येथे उद्योगधंद्यांना चालना मिळेल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल असे मत व्यक्त केले.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत सुहास कांदे हा फार डेंजर माणूस असून कामासाठी तो काहीही काहीही करायला तयार असतो. अगदी मुंगी बनून साखर खाण्याचे काम करतो असे मत व्यक्त केले. तर केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांनी फडणवीस सरकारच्या काळात आम्ही करंजवण – मनमाड पाणीपुरवठा योजनेला तत्वतः मंजुरी दिली होती. त्यानंतर पुन्हा शिंदे फडणवीस डबल इंजिन सरकारने हातभार लावत हातभार लावत पूर्णत्वास नेले आहे. यामुळे मी कांदे यांचे आभार मानते असे मत व्यक्त केले.

  आमदार सुहास कांदे यांनी आपल्या प्राथमिकेत अनेक विकास कामे केली असून अनेक विकास कामे आता पूर्ण होतील तर अनेक विकासकामे आता नव्याने सुरू करण्यात येतील. असे सांगितले. तर पालिकेची इमारत अत्यंत जुनी झाली असून यासाठी शिंदे साहेबांनी मदत करावी असे म्हणाले. त्याचवेळी शिंदे यांनी तात्काळ दहा कोटी मंजूर केली असल्याचे जाहीर केले. कमी हेलिकॉप्टरमध्ये बसण्याच्या आत तुम्हाला पत्र मिळून जाईल असेही सांगितले. 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करंजवण – मनमाड योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच नांदगाव येथील शिवसृष्टीचे ऑनलाइन करण्यात आले.     नांदगाव तालुक्यातील जनतेसाठी दोन फिरते दवाखाने, दोन फिरते शासकीय कार्यालये,‌ दोन जेसीबी यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मनमाड शहरातील माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, नांदगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाळकाका कलंत्री, महेंद्र शिरसाठ आझाद पठाण, अजित पठाण, दाऊ तेजवानी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार आदींचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करण्यात आला. आमदार सुहास कांदे व त्यांच्या पत्नी अंजुम कांदे तसेच युवा सेना नेते फरान खान यांच्या हस्ते मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांचा तसेच प्रमुख मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना चांदीची तलवार भेट देण्यात आली. 

यावेळी मंचावर ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, बबी काका कवडे, राजेंद्र अहिरे, जिल्हाधिकारी डी गंगाधरण, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी आयेशा मित्तल,, नितीन पांडे, सचिन दराडे, कैलास अहिरे, संजय निकम, संतोष आहिरे, नारायण पवार, जय फुलवाणी, विलास आहेर, तेज कवडे, रवींद्र घोडेस्वार, प्रकाश चावरिया आधी सह इतर मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे