आपल खान्देश

खते व पेट्रोल दर कमी करावा यासाठी पाचोरा तहसीलदारांना निवेदन

रासायनिक खते, पेट्रोल, डिजेल, आणी घरगुती गॅस दरवाडी विरोधात, युवक राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा तर्फे पाचोरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

श्री. दिलीप परदेशी

पाचोरा Live 24/

दि 18 मे 2021  @ Zoom Marathi news 

पाचोरा | युवक राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतिने, केंद्र शासनाने रासायनिक खते तसेच पेट्रोल, डिजेल, व घरगुती गॅस ची दरवाड केल्यामुळे तहसिलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. पाचोरा तहसिल कार्यालयातील तहसीलदार श्री कैलास चावडे यांनी हे निवेदन स्विकारले. केंद्र शासनाने रासायनिक खते व पेट्रोल, डिजेल, गॅस च्या दरवाड केल्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी त्रस्त आहे. एक तर निसर्गाचा लहरीपना आणी कोरोनाच्या महामारीमुळे शेतकर्यांच्या मालाला कोनताही योग्य भाव मिळत नसल्यामुळे कवडीमोल भावने शेतकर्याला त्यांचा सदर निर्वाहासाठी आपला माल विकावा लागत आहे. ह्या केंद्र शासनाने पेट्रोल डिझेल तसेच घरगुती गॅसचे भाव गगणाला भिडले आहे. तसेच आता पेरणी तोंडावर आल्याने शेतकर्यांना रासायनिक खते भरणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शेतकरी फार मोठया अडचनीत सापडला आहे. आमच्या माता भगनीचा घरगुती गॅस चे भाव सुध्दा गगणाला भिडल्यामुळे संसाराचे आर्थिक गणित बिघडले आहे. तरी केंद्र शासनाने रासायनिक खते, पेट्रोल, डीजल, घरगुती गॅस ची किंमतीत होणारी वाढ तात्काळ थांबवावी नसता लॉकडाऊन संपल्या नंतर जळगाव युवक राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष सर्व शेतकर्यांना सोबत घेवुन रस्त्यावर उतरुन तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

राज्यात कोरोना संसर्गाच्या महामारीने थैमान घातले असून सर्व सामान्या पासून तर देशाचा अन्नदाता मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पूर्ण देश हा आर्थिक संकटाच्या विळख्यात ओढवला गेला असून आज दि. १८ रोजी रासायनिक खतांची वाढ व पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, पाचोरा नगरपालिकेचे गटनेते संजय नाना वाघ यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाचोरा यांच्या वतीने पाचोरा तहसीलचे तहसीलदार श्री. कैलास चावडे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी पाचोरा भडगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन दादा तावडे, नगरसेवक रणजित पाटील सर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष पंकजदादा गढरी, तालुकाध्यक्ष अभिजित पवार, शहर अध्यक्ष अझर खान, सुदर्शन सोनवणे, नगरसेवक एबी. आहिरे सर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष विलासदादा सोनवणे, तालुकाअध्यक्ष विकास पाटील सर, जिल्हासंघटक उमेशभाऊ एरंडे, जिल्हासचिव सचिन शिंदे, सरचिटणीस गौरव पाटील, शहरउपाध्यक्ष गौरव शिरसाट, हेमंत पाटील, प्रदीप वाघ आदी होते. या वेळी दिलेल्या निवेदनात रासायनिक खतांच्या किमती कमी करा, पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करण्यात यावी या मागणीचा समावेश आहे…

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे